ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या विशेष उपस्थितीत रंगला 56 वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा

जागतिक सिनेमा म्युझियममध्ये दादासाहेब फाळके यांचा पुतळा असेल - विनोद तावडे

May 26, 2019 60667 reads comments

टिम स्क्रीनग्राफिया - पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळा आज ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उज्ज्वल निरगुडकर, संकलक कॅरॉल लिटलटन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या पत्नी वर्षा तावडे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. या चित्रपट सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

56 व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळ्यामध्ये यंदा उत्कृष्ट चित्रपट भोंगा ठरला. तर उत्कृष्ट अभिनेता के. के. मेनन व उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे यांनी पुरस्कार पट‍काविला.

चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना तावडे म्हणाले की, अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर ॲवॉर्डस) कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत आवश्यक ती सर्व मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. आज भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच या बॉलिवूड नगरी असलेल्या भारतात बेली हे पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहेत. मात्र मुंबईत कार्यालय सुरु केल्यास येथे आशियातले एक केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहता येईल.वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी, भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार प्रदान

राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, संकलक कॅरॉल लिटलटन, गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते यांच्या हस्ते या वर्षीचे विशेष पुरस्कार देण्यात आले. आपल्या कामाची नोंद घेऊन राज्य शासनाने आपल्याला पुरस्कार दिला याचा अत्यंत आनंद झाल्याचे सर्व पुरस्कारार्थींनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले.ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, संकलक कॅरॉल लिटलटन यांचा सांस्कृतिकमंत्र्यांकडून सत्कारआजच्या कार्यक्रमात ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, संकलक कॅरॉल लिटलटन यांचा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 'डिजिटल डायलेमा' या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या 50 प्रति ऑस्कर अकादमी येथे ठेवण्यात येणार आहेत.

राज्य मराठी चित्रपट सोहळ्यात आज देण्यात आलेले पुरस्कारसर्वोत्कृष्ट कथा - सुधाकर रेडी (नाल)

सर्वोत्कृष्ट पटकथा - शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे ( भोंगा )

सर्वोत्कृष्ट संवाद - विवेक बेळे (आपला माणूस)

सर्वोत्कृष्ट गीत - संजय पाटील (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट संगीत - राजेश सरकाटे ( मेनका उर्वशी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- विजय गवंडे (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - ऋषिकेश रानाडे ( व्हॉट अप लग्न)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका -प्रियंका बर्वे (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक -उमेश जाधव ( मेनका उर्वशी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - के.के. मेनन ( एक संगायचाय अन्सेड हॉर्मनी )

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -मुक्ता बर्वे (बंदीशाला )

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता- स्वानंद किरकिरे ( चुंबक )

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री-छाया क़दम ( न्यूड )

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता- फिरोज शेख ( तेंडल्या)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-गौरी कोठवदे (पुष्पक विमान)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिति- शांताई मोशन पिक्चर्स ( बंदीशाला)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन -सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर ( तेंडल्या)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - भोंगा


या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तिसऱ्या क्रमांकावर तेंडल्या, दुसऱ्या क्रमांकावर बंदिशाला आणि पहिल्या क्रमांकावर भोंगा चित्रपट ठरले. सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून एक सांगायचंय - अन्सेड हार्मनी, आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट भोंगा ठरले.

POLL

WHICH FILM WILL YOU WATCH THIS FRIDAY

  •   Gold 28% Vote
  •   Satyameva Jayate 48% Vote
  •   None 24% Vote
Total votes:   272
Reads:   431362