दोन गाण्यांचे रिकॉर्डिंग पूर्ण करत चित्रपट 'बदनाम गली' चा मुहूर्त

दोन गाण्यांचे रिकॉर्डिंग पूर्ण करत चित्रपट 'बदनाम गली' चा मुहूर्त

January 23, 2020 56747 reads comments

टिएसजी- चित्रपटाच्या मुहूर्तावर 'बदनाम गली' ह्या आगामी चित्रपटाच्या दोन गण्याचे रिकॉर्डिंग पार पडले , हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे. मुहूर्ता वेळी एक रोमँटिक सॉंग , तर दुसरे आयटम सॉन्ग रिकॉर्ड करण्यात आले . रोमॅंटिक सॉन्ग ला अभिजीत कोसंबी आणि  संजीवनी भेलांडे यांनी आपल्या आवाज चा साज चढ़वला आहे तर आइटम सॉन्ग सोनाली पटेल ने गायले आहे .  दोन्ही गाण्याचे चे गीतकार सुबोध पवार आहेत तर मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केली आहेत . 

      चित्रपट पोटासाठी शरीराचा सौदा करणाऱ्या वारांगणांच्या व्यथेची कथा आहे  . "बदनाम गली" हा सिनेमा शारीरिकतेपेक्षा भावनिक तसेच मानसिक पातळीवर जास्त व्यक्त होतो. ह्या  चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक प्रा. दीपक संभाजी जाधव असून त्रिपुरेश्वर प्रोडक्शन बैनर अंतर्गत निर्माता श्याम चौगले निर्माण करत आहेत तसेच कार्यकारी निर्माता म्हणून पोपट कांबळे काम पाहतायेत . 

      सॉन्ग रिकॉर्डिंग वेळी चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक यांनी संगीतकार,गीतकार आणि सर्व गायकां सोबत मुहूर्ताचा एक सुंदर ग्रुप फोटो काढला  .  ह्या क्षणी चित्रपटाची टीम उत्साहित आणि आनंदित दिसून आले .  चित्रपटाची स्टारकास्ट अजुन गुलदसत्यात असून लवकरच जाहिर करण्यात येईल , सध्या चित्रपटाचे संगीत पूर्ण करण्यावर निर्माते आणि दिग्दर्शक यांचा भर आहे। चित्रपटाचा विषय सामाजिक व गंभीर असून स्टारकास्ट ही दमदार असेल यात शंका नाही

POLL

WHICH FILM WILL YOU WATCH THIS FRIDAY

  •   Gold 31% Vote
  •   Satyameva Jayate 39% Vote
  •   None 30% Vote
Total votes:   671
Reads:   662799