मंजूने उचलला आहे शिकायचा विडा - उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची 'ती फुलराणी'
January 24, 2019 54610 reads comments
टिम स्क्रिनग्राफिया- शिक्षण एक असं शस्त्र आहे ज्याने माणूस समृध्द होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचंच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘तीफुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीची तिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करतघेतलेलं शिक्षण...ही आहे 'ती फुलराणी'तल्या मंजूची गोष्ट.
आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, "नोकरांनी शिक्षणाचं स्वप्न पाहू नये!", असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेलीचिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाचआत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे.
आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनक चा जीव जडला... त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमातअसणाऱ्या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही? आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नातं टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार? यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार? जाणून घेण्यासाठी पहात रहा 'ती फुलराणी' फक्त सोनी मराठीवर...